Monday, November 2, 2009

मुक्तपीठ डेक्कन कट्टा

(फोटोवर क्लिक करुन पुर्ण आकारातील फोटो बघता येतील)

शनीवारी संध्याकाळी अचानक फोन खणखणला, रात्रीच्या पाणवठ्याचे मनसुबे रचत असतानाचा फोन वाजल्याने जरा वैतागल्यासारखे झाले. बघितले तर चिंतामणी काकांचा फोनवा आला होता.

"अरे येतोयस ना? आम्ही वाट बघतोय." चिंतामणी काकांचा यॉर्कर.

"कुठे येतोयना ? काय म्हणताय काही कळत नाहीये हो काका" माझा अगतीक डिफेन्स करण्याचा प्रयत्न.

"अरे बाबा राहुल आलाय, विक्रम आलाय आणी अभिजित पोचतोय. मी दिवसभर बाहेर असल्याने तुला फोन करायला जमले नाही मला. ताबडतोब निघ आणी डेक्कन क्लबला पोच."

राघोबा काकांची आज्ञा झाल्या बरोब्बर मी नारायणरावासारखा २० मिनिटात तय्यार होउन डेक्कनकडे कुच केली. त्या अवधित मालकांशी फोनवर चर्चा झाली, मालक आमच्या आधीच रणांगणात पोचले होते. ताबडतोब रिक्षा करुन डेक्कन क्लब गाठला. पळसुले काकांचा 'गेस्ट' आहे असे सांगीतल्यावर खालचा सिक्युरीटी गार्ड एकदम सावरुन वगैरे बसला (घरी काकुं हॉल मध्ये आल्या की काका असेच सावरुन बसतात हे मागच्या कट्ट्यालाच मी हेरले होते. श्रद्धातै तर मागच्या कट्ट्याला पुर्णवेळ हॉलमध्येच बसुन असल्याने तीचे मिस्टर फुल्लटु अटेंशन पोझीशन मध्येच होते. बाय दवे हा कट्टा दिवाळीत झाला, ह्याचा वृतांत उद्या टाकतो. ह्या कट्ट्याला मी, श्रद्धातै (सह कुटुंब)मालक, अक्षु, नरेंद्र साहेब ह्यांनी चिंतामणी काकांच्या घरी हजेरी लावली होती)

हान तर गार्डनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही गच्चीत पोचलो, वरती 'लढाई' अगदी रंगात आली होती. चिंतामणी काका व मालक ह्यांचा परिचय होताच, विक्रमदादांना फोटुमुळे पाहिल्या बरोबर ओळखले. एक काळा सावळासा तरुण माझ्याकडे बघुन हसत होता, "ह्यांना ओळखले का? हे गौतम आदमाने" राहुल अफ्रिकीनी ओळख करुन दिली.


(राहुल अफ्रीकी, गौतम आदमाने आणी चिंतामणी काका)

अर्र तेज्यायला ! हे गौतम आदमाने ? फोटुत चाळीशीचा वाटणारा हा माणुस चक्क चक्क आपल्यापेक्षा वयानी २/३ वर्षानी मोठा असा तिशीतला तरुण आहे हे बघुन मला धक्काच बसला. "राहुल शेठ अहो गौतम आदमाने नाही 'अर्जुन' म्हणा राव त्यांना, माझे मोठे शत्रु." मी तेव्हड्यात एक सवयीने हिणकस शेरा मारुन घेतला. दोघे एकमेकांकडे बघुन निर्मळ हासलो आणी 'लढाईला' जुंपलो.

मुक्तपीठावरची लोक कशी असतील काय सांगता येत नाही, उगाच रिस्क नको म्हणुन राहुल अफ्रिकी आपल्या बरोबर २ तगड्या मित्रांना बरोबर घेउन आले होते. हे मित्र अफ्रिकेतही त्यांच्या बरोबर होते म्हणे. ओळखी पाळखी झाल्यावर मग गप्पांना खरा रंग भरला. 'वारुणीचे' २/२ राउंड संपले आणी गप्पा खर्‍या अर्थाने खुलु लागल्या.(राहुल आणी त्याचा संरक्षक मित्र सचिन कवडे )

सर्वात आधी मालकांनी मुक्तपीठावर चालणारे वाद, काही चांगल्या चर्चा तसेच सभासदांविषयी चार गोष्टी ऐकवल्या, पण एकुणात मालक खुष दिसत होते. त्यानंतर मग डेक्कन क्लबची माहिती आणी खेळ आणी त्यातील राजकारण ह्यावर चिंतामणी काकांचे मौलीक विचार ऐकुन झाले. राहुल, मालक आणी राहुलच्या मित्रांकडुन विविध धर्म व त्यातील गंमतीजंमतीचे विधी, सण ते साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ह्याबाबत मनोरंजनात्मक माहिती मिळाली. मधल्या वेळात काही तातडीच्या कामानी विक्रम ह्यांनी आमची रजा घेतली. जाताना सर्वांना आपल्या गावचे आग्रहाचे निमंत्रण द्यायला ते विसरले नाहीत.


(गौतम आदमाने आणी शेजारी सुहास्य वदनाने विक्रम राजे)


(मालक आपले चार मार्गदर्शनपर शब्द ऐकवताना)


(चिंतामणी काका आणी मृत्युंजयाची तु तु मै मै)


(मंडळी भोजनाचा आस्वाद घेताना)

मुक्तपीठावर काय अभिनव राबवता येईल ह्यावर चर्चा चालु असतानाच नरेंद्रजी गोळेजी ह्यांचे आगमन झाले, साहेब स्वभावानी अतिशय शांत असल्याने ते फक्त ऐकण्याचे काम करण्यात लगेचच मग्न झाले. सगळ्यांचा आवडता 'फेक प्रोफाईल्स' हा विषय निघाल्यावर मात्र गोळे साहेबांनी आपल्या ४ शब्दांची लगेचच भर घातली.

वाद, संवादाचा भर ओसरल्यावर भुकेची जाणीव व्हायला लागली, थोड्याच वेळात शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची ऑर्डर दिली गेली आणी मंडळी काहि वेळातच 'अन्न हे पुर्णब्रम्ह' म्हणत भोजनाचा आनंद घेउ लागली. थोड्याच वेळात 'वन फॉर द रोडचा' आग्रह होउन त्याची पुर्तता झाल्यावर सगळ्यांनीच एकमेकांचा निरोप घेतला ते लवकरच पुन्हा भेटण्याचे पक्के ठरवुनच.


(निरोपाची तयारी,डाव्या हाताला नरेंद्र गोळे साहेबांची श्रवणभक्ती चालुच आहे, उजवीकडे दिपक साहेब , मुक्तपीठाचे एक सदस्य आणी राहुलचे एके काळचे अफ्रीकेतील सहकारी)

16 comments:

 1. लय भारी, ते जास्त दाखवून आम्हास जळ्वू नका राजे,
  लवकरच पुढच्या पाणवठ्याची तयारी करा

  ReplyDelete
 2. Are tya Deepak la Sandeep kelaat tumhi aani Sachin la Deepak

  ReplyDelete
 3. अरे त्या दिपकला संदीप केलात तुम्ही आणी सचिन ला दिपक.बाकी लिखाण छान आहे.


  तो संरक्षक मित्र दीपक नसुन ,सचिन कवडे साहेब आहेत.आपल्या मु.पि.चे

  ReplyDelete
 4. आपल्या लिखाणाने स्वतःविषयी प्रचंssssड कुतूहल निर्माण करणारे हेच का ते "मृत्युंजय".....बर बर बर.... :)

  ReplyDelete
 5. ते नरेंद्र 'गोळे' नसून 'कुलकर्णी' असावेत. गोळाबेरीज चुकवू नका राव!

  आणि पाणवठ्यावर अल्कोहोल ऐवजी पालक/गाजर यांसारख्या भाज्यांचे रस सर्व्ह करण्याचा बेत असेल तेंव्हा मला कळवा. मी येईन त्या संमेलनाला.

  प्रज्ञा

  ReplyDelete
 6. गोळे हे आडनाव ह्या अर्थी घेउ नका हो :( जसे राहुलच्या नावापुढे अफ्रिकी हे प्रेमाचे नाव लावले आहे तसे नरेंद्र राव चोरपकडे ह्यांच्या नावापुढे गोळे लावले आहे.

  ReplyDelete
 7. राहुल त्यांच्या डिपितल्या फोटोपेक्षा चांगलेच गोलमटोल आहेत ;)
  आणि मॄत्युंजयराव चांगलेच शीडशिडीत आहेत कि , नावावरून असे भारदस्त चित्र उभे राहते डोळ्यासमोर ;)

  ReplyDelete
 8. आम्हाला घ्याना तुमच्यात
  अविनाश

  ReplyDelete
 9. फोटो पाहून तोंडाला अल्कोहोल सुटलं आपल्या

  ReplyDelete
 10. Kaka, Machhi curry was damn good.

  ReplyDelete
 11. च्या मारी, तुम्ही सर्वजन खरंच पीता की राव.
  शी ! :x

  आमच्या विक्रमरावांना काही खाऊ घातलंच नाही वाटतं तुम्ही लोकांनी. :(


  मृत्युंजय आजोबा ? :O
  तुम्हीच का हे ?


  छान वर्णन केले आहे पाणवठ्यावरचे.  ईमेज टाकायची असेल ब्लॉगपोस्टमध्ये तर खालील फॉर्मॅटमध्ये टाका.
  img src="Your Image Link" height=100% width=100%

  ReplyDelete
 12. hmmm...muktpeethakaranche khare chehare....

  Mrutunjay mhanje konitari aaD-daanD maaNoos asel asa vaatal hot.....

  ReplyDelete
 13. hmm..............

  ReplyDelete
 14. lekaho changli maja kelit

  prasad bhari lihile ahes

  ReplyDelete