Thursday, May 20, 2010

मुक्तपीठ परीवाराची स्नेहभेट

लेखक :- श्रद्धातैआज मुक्तपीठ परीवाराची स्नेहभेट....खुपच उत्साहात होते मी...काहीजणांना प्रत्यक्ष भेटलेले पण यावेळी खुपच नवे चेहरे भेटणार होते..
पटवर्धन कुटुंबियांकडे मी, माझी कन्या गौरी, ज्योती आणि जिजु [चिंतामणी पळसुले] यांच्याबरोबर निघाले.आम्ही शिल्पाच्या घराजवळच पोचलो पण नक्की कुठे ते समजेना म्हणुन ज्योतीने शिल्पाला फ़ोनवले असता आम्ही कुठे आहोत ते सांगितल्याव्र तिथेच थांबा आलेच मी म्हणत तीने चिंतामणी मामांना पाठवले. ते धावत पळत [रेसमधे पळतात तसे] आम्हाला न्यायला आले की, रस्त्यावरचे बरेच जण हे असे का पळत आहेत अशा कुतुहलाने त्यांच्याकडे पहायला लागले. आम्ही लांबुनच त्यांना ओळखले. आम्हा तीघींना घेउन मामा घरी निघाले असता वाटेत एका जेष्ठ व्यक्तीने विचारले पण, का रे असे धावत होतास? पण त्यांना ते काय सांगणार की आपल्या मुपीच्या माननीय महिला सदस्यांचे पटवर्धनांच्या घरात आगमन होत होते आणि त्यातील एक स्वता मॉडरेटर होती आणि एक मॉडरेटरची सौ.... त्यांच्या स्वागतात कसुर करुन चालणार नव्हते. न जाणो उद्या बॅन केलं तर? :Pअसो... तर सुहास्य वदनाने शिल्पा आणि चिंतामणी यांनी आमचे स्वागत केले. घरी सर्व तयारी करुन ठेवलेली होतीच. हॉल मधे सतरंज्या घालुन तयार होत्या..[ हा पशा त्यासाठी उशीरा येणार होता]...ग्लास आणि बाटल्या हॉलमधे तयारच होत्या ...हा हा थांब पशा लगेच डोळे मोठे करुन बघु नकोस...पाण्याच्या बाटल्या होत्या त्या. आम्ही पोचल्यावर ५ मिनिटातच समीर जोशीचे आगमन झाले आणि तेवढ्यातच मामांचा फ़ोन वाजला, कोणीतरी जवळपास आलेले होते.... मामा परत पळाले आणि परदेशस्थ निनाद कुलकर्णी याला घेउन आले.

शिल्पाची ऑर्डर झाली आणि मामा परत पळाले...कशासाठी? अहो पावभाजी आणि आइस्क्रीम आणण्यासाठी...सोबत ते समीर आणि निनाद ला घेउन गेले. एवढ्यात माझा फ़ोन वाजला आणि मी पण पळाले...का? जा बाबा मी नाही सांगणार [:P] बरोबर ओळखले आपली आरती आलेली तीला आणि सोनालीला घेउन आले मी...त्याचवेळी जान्हवीचे पण [सौ.सुहास गोरे] आगमन झाले. मधेच मी कुणाचा तरी फ़ोन आल्याने फ़ोन वर बोलत बाहेर गेले तेव्हा निर्झर उर्फ़ तुषार आला..आणि लागोपाठच मंजीरी, मीनल, सुलक्षणा,अपर्णा,लता आणि ऋता पण आल्या.योगेश आणि सुयोग पण प्रवेशकर्ते झाले. सुयोग स्वामीजींनी घातलेल्या भितीमुळे जरा सावधपणे इकडे तिकडे बघतच आत आला. वृषाली आणि गौरी आल्या पण संजयचा अजुन पत्ता नव्ह्ता. [सासुरवाडी सोडवत नव्हती बहुधा अजुन] आणि थोड्याच वेळात जळगावच्या या डॉनचे आगमन सुपुत्रासहीत झाले. सुहास पण त्याच वेळेत आला. एवढे सदस्य आले तरी अजुन मा.मा. आणि आ.मा. यांचा तसेच जिजु,पशा, अमृता आणि आमचे चिरंजीव यांचा पत्ता नव्हता.अनंत कुलकर्णी,शामु,निलेश पण अजुन आलेले नव्हते. सम्राट बरोबर फ़ोनवर बोलणे झाले असता त्याच दिवशी त्याच्या सौ गावहुन आल्याने त्यांच्या दिमतीसाठी व्यस्त असल्याने जमेल असे वाटत नाही म्हणाला. साहजीकच आहे.. बहुधा स्नेहभेटीचा नियम वाचला नसेल त्याने. :Pआणि १५ मिनिटातच या राहिलेल्या कंपुचे आगमन झाले...प्रधानकाका पण आले. प्रसाद ने आत आल्या आल्याच मीनलकडे अतिशय प्रेमाने पाहिले आणि माझ्यासाठीच्या वालनहाणासाठी वाल आणले नाहीस ना असे डोळ्यानेच विचारले तर मीनलने आपण आणलेल्या वालांमधे पशाचे वालनहाण होइल ना शा साशंकतेने पाहिले... आज आपली मुपी सदस्या वृषालीचा वाढदिवस असल्याने तीचा शिल्पाच्या हस्ते बुके देउन सर्वांनी अभिनंदन केले......आणि त्यानंतर चालु झाली ओळख परेड....आणि हास्याचे तुषार, कारंजी, धबधबे क्रमाक्रमाने कोसळु लागले...ओळखी दरम्यान अभिजीतने कंप्लीट आराम निलेश ची चांगलीच मुलाखत घेतली...निलेशला अगदी दाखवायला आणलेल्या मुलाचा फ़ील आला असेल बहुधा... :P याच ओळखी दरम्यान आमच्या चिरंजीवांनी आमची विकेट घेतली [तो माझा दोडका मुलगा आहे असे सांगुन] ....तसेच मला मुपीच्या मातोश्री ही पदवी अभिजीत ने मुक्तकंठांने बहाल केली...ओळख चालु असतानाच सर्वांचेच लक्ष आणि नाक स्वैपाकघराच्या दिशेकडे लागलेले. पावभाजीच्या दरवळलेल्या गंधाने हातात केव्हा एकदा प्लेटस येतात असे सगळ्यांनाच झालेले. सर्व महिलामंडळाच्या मदतीने पावभाजीच्या प्लेटस सर्वांना दिल्या आणि गप्पा मारत हाता तोंडाची लढाई चालु झाली. सगळ्यांनीच पावभाजीवर मनसोक्त ताव मारला.

पण पशा आणि निलेश कुठे दिसेनात....चौकशीअंती ते दोघे केक आणण्यासाठी पिटाळलेले होते असे समजले. काही मित्रमंडळींचे आणि महिला वर्गाचे खाउन होत आले असतानाच प्रसाद आणि निलेश केक घेउन आले.
वृषालीने केक कापताच सगळ्यांनी परत तीचे अभिष्टचिंतन केले आणि संजयने केक चा तुकडा प्रेमभराने सर्वांच्या उपस्थितीत वृषालीला भरवला आणि काय लाजली वृषाली.....वृषालीच्या चेहर्‍यावरचे ते गोड भाव ...आहाहा....संजय बहुधा सगळे आहेत जवळपास हे विसरुन पहातच राहिला तिच्याकडे. वृषालीने गौरी आणि तन्मय ला पण केक खाऊ घातला...राहिलेले महिला मंडळ,पशा आणि निलेश पावभाजीचा आस्वाद घेउ लागले..सुलक्षणा आणि अमृता या आम्हाला पावभाजी आग्रहाने वाढुन आपण गृहकृत्यदक्ष असल्याचे दाखवुन देत होत्या [ यंदा कर्तव्य आहे की काय? :P ] पण त्या दोघींनी राहिलेल्या मंडळींना छानच वाढले हे खरे..पावभाजी खाउन झाल्यावर व्हॅनिला आइस्क्रीम चा स्वाद सगळ्यांनीच मनसोक्त घेतला. अभिजीत आणि जिजु तिथे पण चिअर्स करण्याच्या मुड मधेच...ग्रेटच..आइस्क्रीमचा स्वाद घेतानाच अभिजीतने एक घोषणा केली...

१. आपण एक शॉर्टफिल्म करायची म्हणतो आहोत. आपल्या कम्युनिटीतील एक सदस्य संदीप बढे यांची ही कल्पना आहे. सारी कामं आपणच करायची. अगदी गरजेपुरती बाहेरची मदत घ्यायची. कथा, पटकथा, संवाद, अभिनय अशा साऱ्या गोष्टी आपणच सांभाळायच्या आहेत.

आणि प्रसाद ने दुसरी घोषणा केली..

२. आपण मुपिकर या नावानं ऑनलाईन रेडिओ सुरू केला आहे. त्यात फक्त गाणी वाजवण्याऐवजी आपल्या सदस्यांनीच सादरीकरण करावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे कोणी कवितावाचन करेल, कोणी पुस्तकातील उतारे वाचेल, कोणी आपले लेखन सादर करेल, कोणी मुलाखती घेईल किंवा काहीही...

सगळ्यांनाच या दोन्ही घोषणा ऐकुन आनंद झाला....टाळ्यांच्या गजरात दोन्ही घोषणांचे स्वागत झाले...

राहिलेल्यांचे आइस्क्रीम खाउन झाल्यावर एकेकाला घरी परतण्याचे वेध लागले.... मी आणि ज्योती शेवटी निघालो...

खरच कार्यक्रम तर एकदम बहारदार झाला...महत्वाचे म्हणजे आम्ही कोणीच नव्याने भेटतोय असे वाटले नाही सगळे बालपणीचे मित्र मैत्रिणी भेटत आहोत असे वाटले...मुख्यम्हणजे मुक्तपीठची स्नेहभेट असुन पण मुपीचा विषय नव्हता मस्त गप्पा रंगल्या.....खरेतर शिल्पा आणि चिंतामणी यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात...खुपच अगत्याने त्यांनी हा कार्यक्रम सगळ्यांच्या साथीने संपन्न केला...


इतर फोटुंची लिंक :- http://picasaweb.google.co.in/soudikarshraddha888/MuktpeethSnehabhet?feat=directlink#

2 comments:

  1. श्रद्धा .......खूपच छान लिहिलंय .. मला तर मी तिथेच असल्याचा भास झाला !!!!!!!!

    ReplyDelete
  2. हा हा हा हा...भारीच लिहिल॑ आहे...खुपच छान...श्रद्धा काकु॑च॑ इतक॑ छान लिखान पहिल्या॑दाच वाचायला मिळतय॑...

    ReplyDelete